By  
on  

'येऊ कशी तशी नांदायला' फेम ओमची लगीनघाई, रिअल लाईफ स्वीटू सोबत चढतोय बोहल्यावर

'येऊ कशी तशी नांदायला' ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील नायक-नायिका ओम आणि स्विटू यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर तर तरुणींचा खुप लाडका. नुकतीच शाल्वची लगीनघाई सुरुय. त्याच्या रिअल लाईफ  स्विटू सोबत तो लग्नबंधनात अडकतोय. 

शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांचा मेहेंदी सोहळा पार पडला. शाल्व व श्रेयाच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी शाल्व व श्रेयाने पिवळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ट्युनिंग केलं होतं. 

 

शाल्व व श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रेया ही एक स्टायलिस्ट आहे. शाल्वने मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाल्व व श्रेया यांची सोशल मिडीयावरुन अनेकदा जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळालीय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive