By  
on  

याद उसी को रखा जाता है, जिसने 'दिल' जिता हो... : किरण

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 चं विजेतेपद जरी थोडक्यात हुकलं असलं तरी आपल्या शिवने मनं जिंकली. अनेक कलाकारांनी शिवच्या खेळाचं कौतुक करत सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

बिग बॉस मराठी फेम किरण मानेंनीही शिव ठाकरेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिव ठाकरेबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. “याद उसी को रखा जाता है, जिसने ‘दिल’ जिता हो…फर्क नही पड़ता, हाथ में ट्रॉफी हो, या ना हो ! शिव, भावा मस्स्त खेळलास. लै भारी”, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधूलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive