By  
on  

व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने 'उर्मी' चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

उत्तम कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या "उर्मी"  या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने लाँच करण्यात आले.१४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट महिला केंद्रित असल्याचं जाणवतं. 
 
समृद्धी क्रिएशनच्या डॉ. प्रवीण दत्तात्रय चौधरी यांनी "उर्मी" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनीच चित्रपटासाठी कथा आणि गीतलेखनही केलं आहे. डॉ. चैताली प्रवीण चौधरी आणि मालतीबाई दत्तात्रय चौधरी यांनी चित्रपटाची सहनिर्माती केली आहे. राजेश बालकृष्ण  जाधव यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चौधरी यांनी संगीत, कौशल गोस्वामी यांनी छायांकन अनंत मारुती कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे तर महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. 

अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री सायली संजीव, रसिका सुनील, नितीश चव्हाण आणि माधव अभ्यंकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. "उर्मी" या चित्रपटात दोन अभिनेत्री असून पुढे आता काय घडणार यासाठी अजून जरा वाट पहावी लागणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive