By  
on  

‘बिग बॉस ४’नंतर महिन्याभरातच अक्षय केळकरने दिली गुड न्यूज, “बेबी ऑन बोर्ड…”

‘बिग बॉस  मराठी ४’ च्या विजेतेपदावर अभिनेता अक्षय केळकरने नाव कोरलं. ‘बिग बॉस’मुळे अक्षय चांगलाच चर्चेत आला. सोशल मिडीयावर अक्षय चांगलाच चर्चेत असतो. सध्या सुरु असलेले त्याचे सगळे अपडेट्स तो चाहत्यांसमोर आणतो. बहिणीचं लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर आता अक्षयने एक गुड न्यूज दिली आहे. ती गुड न्यूज पाहून चाहते संभ्रमात पडले आगेत. कारण अक्षय आता बाबा होणार आहे. तुम्हालासुध्दा हे वाचून आश्चर्य वाटलं ना.

 ‘बेबी ऑन बोर्ड’ असं म्हणत अक्षय आणि समृध्दीने एक नवी पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने त्याच्या आगामी वेब फिल्मचा टीझर शेअर केला.

ही गुड न्यूज म्हणजे समृद्धी आणि अक्षयच्या ‘दोन कटिंग’ या वेब फिल्मचा तिसरा भाग येत आहे. याचा एक टीझर त्याने सोशल मीडियावर शेअर केला. यात समृद्धी अक्षयला ती प्रेग्नंट असल्याचं सांगताना दिसत आहे. तर समृद्धीचं हे बोलणं ऐकून अक्षयही भावूक झालेला दिसला.

 

 

अनेकदा समृध्दी आणि अक्षय एकत्र दिसतात. रील्स शेयर करतात. या दोघंचा नाखवा नावाचा एक व्हिडीओ सॉंग अल्बमही प्रचंड लोकप्रिय आहे. आता सर्वांनाच या नव्या वेब फिल्मची उत्सुकता लागली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive