By  
on  

मायराला वेध शिवजयंतीचे, नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर आणि फेट्यात दिसतेय सुंदर

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. मालिका संपली असली तरी विविध माध्यमातून परी चाहत्यांच्या भेटीस येते . सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

आता शिवजयंती जवळ येतेय. येत्या १९ फेब्रुवारीला राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. पण तत्पूर्वीच मायराने उत्साहात शिवजयंतीनिमित्त फोटोशूट केलं आहे. 

गर्द निळ्याशार रंगाची साडी, कपाळावर चंद्रकोर आणि त्यावर भगवा फेटा अशा  मराठमोळ्या वेशभूषेत मायरा उठून दिसतेय. 

हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन मोठ्या ऐटीत मायराने हे फोटोशूट केलं आहे. 

मायराच्या या शानदार फोटोशूटवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. 

 

जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावर मायराने हे फोटोशूट केलंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive