By  
on  

Video : पुरस्कार सोहळ्यात आई कुठे काय करते फेम आईच्या इंडोवेस्टर्न ड्रेसचीच चर्चा!

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या आवडीच आहेत. आई या व्यक्तिरेखेतील मधुराणी गोखले-प्रभुलकर तर रसिकांच्या गळ्यातील ताईत आहे. नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले हिने खास ट्रेडीशनल ट्विस्ट असलेला ड्रैस परिधान केला होता. म्हणजेच मधुराणीने पारंपारिक ड्रेस सोबत वेस्टर्न स्टाईल कॅरी केली होती. 

या सोहळ्यात सगळेच कलाकार महाराष्ट्रीय आऊटफिट्सला फॅशनचा तडका लावून रेड कार्पेटवर दिसले.

अरुंधतीनं म्हणजेच अभिनेत्री मधुराणीनं गुलाबी गाऊन आणि त्यावर हिरव जॅकेट घातलं होतं. तिचा हा लुक सर्वांहून वेगळा दिसला.

तिला स्वत: ला साडीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हा ड्रेस प्रचंड आवडला. 

 मधुराणीनं घातलेला ड्रेस तिनं तिच्या लग्नातील साडीपासून तयार केला होता. एक स्टाईलिश लुक तिने दिल्याने तिचं ह्या ड्रेस सोबत भावनिक नातं जोडलं गेलं.

आता आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीचं आशुतोषसोबत लग्न आहे. त्यामुळे मालिकेतील लगीनघाईसाठी आणि विविध साड्या नेसण्यासाठी मधुराणी खुप उत्सुक आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive