By  
on  

अभिमानास्पद! प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार

रंगभूमी गाजवणारा अभिनेता अशी प्रशांत दामले यांची ओळख आहे. रंगभूमीवर नाटकांचे अनेकानेक विक्रम करणारे प्रशांत दामले म्हणूनही ते सर्वदूर प्रसिध्द आहेत. रंगभूमीमध्ये ते समरसून गेले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं. त्यानिमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार मिळाला आहे.

मराठी रंगभूमीसाठी आणि मराठी नाटकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अभिनेत्री कविता मेढेकर यांनी या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांसह कलाकारांकडून प्रशांत दामले याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

प्रशांत दामले यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मोठा सन्मान झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याचा व्हिडिओ शेयर करत कविता म्हणतात.. आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण.. अभिनंदन प्रशांत अशा शब्दात कविता यांनी अभिनंदन केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive