शिवसेना हे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला. याबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. आता पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे. पहाटेच्या शपथविधीपासून अनेक घटनांचा पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघतंय.
राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना आता मराठी अभिनेत्याने केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. अभिनेता संदीप पाठकने राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं ट्वीट केलं आहे. “मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं संदीपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये संदीपने राज्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आप, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांना टॅगही केलं आहे.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @INCIndia @AAPMumbai— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023
संदीप मातीतला कलाकार आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान मिळवलंय. तो नेहमीच सामाजिक भान जपताना दिसून आला आहे. परखड मत मांडणारा संदीप पाठकच्या या ट्विटने आता कशा प्रतिक्रीया उमटतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार ाहे.