पाठकबाई आणि राणादा ही महाराष्ट्राची लाडकी जोडी लग्नबंधनात अडकली. त अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा शाही लग्नसोहळा पार डिसेंबरमध्ये पार पडला. टीव्हीवरची ही लोकप्रिय जोडी आता रिअल लाईफमध्येसुध्दा एकत्र आहे. दोघंही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आता अक्षया व हार्दिक त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे त्यांच्या प्रत्येक पोस्ट, व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतंच.
अक्षया हार्दिकबरोरचा सुंदर फोटो शेअर करत म्हणाली, “हा फक्त माझा माणूसच नव्हे तर माझं घर, माझी विश्रांती, माझं हृदय आणि माझं सुरक्षित ठिकाण आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”. अक्षयाच्या या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षया व हार्दिकच्या फोटोचं सगळेच कौतुक करत आहेत.
हार्दिकनेही अक्षयाची ही पोस्ट पाहून “आय लव्ह यू” अशी कमेंट केली आहे. आता खरंच मालिकेप्रमाणे दोघांना ‘तुझ्यात जीव रंगला’ असंच म्हणायचं आहे.