नटखट कान्हा! कृष्णाच्या रुपात परी दिसली खुपच गोड

By  
on  

नेहा कामतची लेक परी म्हणून मायराची माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. मालिका संपली असली तरी विविध माध्यमातून परी चाहत्यांच्या भेटीस येते . सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

नुकतंच मायरा नटखट क्रिष्णाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे. 

 

मायराने नुकतंच तिचं एक नवीन फोटोशूट केलं. या फोटोंसाठी तिने श्रीकृष्णाची वेशभूषा केली आहे. निळ्या रंगाचे काठ असलेला पिवळ्या रंगाचा तिचा ड्रेस आहे आणि त्यावर मोरपिसदेखील आहे. यासोबतच डोक्यावर मोती लावलेली पगडीही तिने घातली आहे. ही खास पगडी मायराच्या आईनेच डिझाईन केली आहे. 

या लुकमध्ये गोंडस परी फेम मायरा खुप गोड दिसतेय. चाहत्यांकडून तिच्यावर लाईक्सचा आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय. 

Recommended

Loading...
Share