By  
on  

ह्रता दुर्गुळेने चाहत्यांकडे केलीय नाव आणि नंबरची मागणी, काय आहे प्रकरण?

टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्यांच्या जोरावर प्रेक्षांची मनं जिंकणारी अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आता सिनेविश्वात आपलं स्थान निर्माण करतेय. अनन्या, टाईमपास ३ यांसारख्या सिनेमांमधून ती भेटीला आली. प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरुन प्रेम केलं.  आता लवकरच तिचे आगामी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. या सिनेमाच्या निमित्तानं हृतानं तिच्या चाहत्यांना एक खास ऑफर दिली आहे. त्याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर हृतानं शेअर केली आहे.

या सिनेमाच्या निमित्तानं हृतानं तिच्या चाहत्यांना एक खास ऑफर दिली आहे. त्याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर हृतानं शेअर केली आहे. या सिनेमाच्या संदर्भातच चाहत्यांसाठी एक खास ऑफर दिली आहे. ही ऑफर हृतानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हृतानं म्हटलं आहे की, 'हाय फ्रेंडस्.. माझा एक नवा मराठी सिनेमा लवकरच येतोय आणि त्या संदर्भात तुम्हा सगळ्यांना एक धमाल सरप्राइज द्यायचंय!'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

“हाय फ्रेंडस, माझा एक नवा मराठी सिनेमा लवकरच येतोय आणि त्यासंदर्भात तुम्हा सगळ्यांना एक धमाल सरप्राईज द्यायचंय! त्या सिनेमाचं नाव, रिलीज डेट तुम्हाला एकदम पर्सनलमध्ये सांगायचंय…! माझ्या या नव्या फिल्मची announcement मी नाही तर मायबाप प्रेक्षकांनी म्हणजे तुम्ही करावी अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे. आहे की नाही कमाल!! तुम्हाला ते टीझर हवं असल्यास मला खाली दिलेल्या आयडीवर ताबोडतोब मेल करा. मला टॅग करुन तुम्ही लाँच करा माझ्या नव्या सिनेमाचे टीझर…ईमेलमध्ये या गोष्टी मेन्शन करा…तुमचे संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे शहर”, असं ऋताने पोस्टमध्ये लिहलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

सर्वांनाच आता ह्रताच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive