By  
on  

“पडदा व ड्रेस एकसारखाच”म्हणणा-याला सईचं सडेतोड उत्तर

मराठीसह हिंदीत देखील आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. नाटक,मालिका, सिनेमा आणि वेबसिरीज मध्ये काम करत तिने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

मराठीतली बोल्ड अँड बिनधास्त म्हणून ओळखली जाणारी सई तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीचं चर्चेत. फॅशन सेन्समुळेसुध्दा तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 

सोशल मीडिया अकाऊंटद्वारे सई अनेकदा फोटो शेअर करताना दिसते. आताही तिने असेच काही फोटो पोस्ट केले आहेत. सईचे हे फोटो पाहून काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन खास फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये तिच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे पडदे दिसत आहेत. यावरुनच ट्रोल करणाऱ्याला सईने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. “पडदा व ड्रेस एकसारखाच वाटत आहे बरं का सई…” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. ही कमेंट पाहिल्यानंतर सईने त्याला रिप्लाय केला.

सई म्हणाली, “हो. अगदी बरोबर. त्याला टोन ऑन टोन असं म्हणतात”. सईने या फोटोशूटच्या रंगसंगतीला नेमकं काय म्हणतात? हे त्या ट्रोलर्सला एका वाक्यातच सांगितलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive