By  
on  

अमृता खानविलकरने घेतला हा मोठा निर्णय, म्हणते 'लवकरच भेटू'

महाराष्ट्राची लाडकी चंद्रमुखी आपल्या तालावर सर्वांनाच नाचवते आणि आपल्या घायाळ करणा-या अदाकारीने व अभिनयाने वेड लावते. चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर ही आघाडीची मराठी अभिनेत्री सिनेसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही दिमाखात झळकते. अमृता सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेकत असते. नवनवे फोटोशूट, रील्स व्हिडीओ, फॅन्स सोबतची मस्ती असो किंवा आगामी सिनेमाचं प्रमोशन. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. पण काल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी वाचून सर्वांनाच धक्का बसला.

अमृताने सोशल मिडीयावरुन ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “मी तुला पुन्हा भेटेन…जेव्हा योग्य वेळी आपले मार्ग कधीतरी पुन्हा एकमेकांसमोर कधीतरी येतील.” ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिलं, “गुडबाय… मी ब्रेक घेत आहे. लवकरच पुन्हा एकदा भेटू.” तिची ही पोस्ट वाचून सर्वच जण आवाक् झाले. आता तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. पण तिने हा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive