मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा तो धक्कादायक अनुभव

By  
on  

मनोरंजन विश्वात काम करताना कलाकारांना अनेक बरे-वाईट अनुभव येतात. परंतु काही अनुभव हे इतके कटू असतात की त्यांच्या आठवणीसुध्दा नकोशा वाटतात. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कामाच्या शोधात असताना कास्टिंग काऊचचा अनुभव येतो. या क्षेत्रात नवखे असल्याने त्यांना कास्टिंग काऊचचं शिकार व्हावं लागतं. प्रतिकार केला तर काम हातातून जाण्याचीही भिती असते. असाच एक धक्कादायक अनुभव प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा सावंत हिने सांगितला आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीला आलेला हा धक्कादायक अनुभव शेयर केला.  ती सांगते. एका एजंटने मला त्याच्या ऑफीसमध्ये बोलावलं होतं. तेव्हा मी अवघ्या २० वर्षांची होती आणि करिअरचा श्रीगणेशा करण्यासाठी धडपडत होते. तेव्हा ऑडीशन देणं अगदीच सामान्य होतं.  मी कामाबाबत चर्चा करण्यासाठी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले तेव्हा तो माझ्या जवळ आला. त्याने मला धरून त्याच्याजवळ ओढलं आणि या सगळ्या घटनेने मी खूप घाबरले. त्यावेळी मी तेथून पळ काढला.”

पुढे ती म्हणाली, “त्या घटनेतून मी महत्वाची गोष्ट शिकले की आता मी कोणाला भेटताना जास्त काळजी घेते. मीटिंग्सना जाताना मी नेहमी कोणालातरी माझ्यासोबत घेऊन जाते, विशेषत: ज्यांना मी ओळखत नाही त्यांना भेटण्यापूर्वी त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेते.”

मराठमोळया ऋतुजा सावंतने ‘मेहंदी है रचने वाली’, ‘छोटी सरदारनी’ आणि ‘पिशाचिनी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share