होळी म्हणजे धम्माल आणि उत्साहाचा सण. रंगपंचमीला तर लहानांसोबत मोठेसुध्दा लहान होऊन रंग खेळण्यात बेधुंद होतात. अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेसुध्दा अशीच रंगपंचमीची धम्माल नवरा अभिषेक सोबत केलीय.
रंगपंचमीला दोघंही रंगीबेरंगी रंगात तर न्हाऊन निघालेच आहेत. पण दोघांनीसुध्दा खास रोमॅण्टिक फोटोशूटही केलंय.
प्रार्थनाचा नवऱ्यासोबत एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे.
प्रार्थनानं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, Colour of love … Happy Holi everyone.
हे फोटो पाहून दोघांनीही जोडीने धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी केलीय यात शंका नाही.