प्रिया बापट आणि उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. तर कधी त्यांच्यातील अवखळ मस्तीसुध्दा पाहायला मिळते. ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा या जोडीची अफलातून केमिस्ट्री सोशल मिडीयामुळे चाहत्यांपर्यंत पोहचते.
होळीनिमित्ताने नुकतंच प्रियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या आईनं दिलेल्या टीप्स वापरून प्रियाने पुरणपोळी केली आहे. पुरण कसा करायाच तसेच कसा वाटायचा नंतर त्यासाठी कणीक कशी मळायची व नंतर पोळी कशी लाटायची व भाजायची हे सगंळं तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
प्रियाच्या हातची पुरणपोळी खाल्यानंतर उमेश म्हणताना दिसत आहे की, पुरणपोळी..माझ्या आईच्या हातची पुरणपोळी आणि आता बायकोच्या हातची पुरणपोळी..वॉव. उमेश प्रसन्न होऊन सांगताना दिसत आहे. सध्या प्रियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर कॉमेंट्स केल्या आहेत.
खरंतर प्रियाने यात दिग्दर्शक वरुण नार्वेकरला टॅग करत पाहतोयस ना, असा प्रश्न केला आहे... कारण प्रिया-उमेश जोडीची गाजलेली वेबसिरीज आणि काय हवंच्या एका सीझनच्या एपिसोडमध्ये पुरणपोळी स्पेशल भाग होता. यात प्रियाला पुरणपोळी येत नसते पण ती प्रयत्न करायची थांबत नाही आणि अखेर उमेश समोर ती त्याच्या आईसारखीच टम्म फुगलेली पुरणपोळी हजर करते.