By  
on  

रंगपंचमीला फिल्टरपाड्याच्या बच्चनला ओळखताही येईना, अशी झाली अवस्था!

धुळवडीनिमत्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला, सेलिब्रिटीसुध्दा सोशल मिडीयावर सक्रीय होते. व आपल्या सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेयर करत होते. रंगात न्हाऊन निघालेल्या सेलिब्रिटींना पाहणंसुध्दा एक पर्वणीच. 

-‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम या कार्यक्रमामुळे गौरव मोरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणार गौरव मोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्स तो चाहत्यांपर्यंत पोहचवतो. रंग खेळून झाल्यानंतर रंगपचमीला एक फोटो गौरवने ट्विट केला आणि या फोटोवर प्रतिक्रीयांचा पाऊस पडला. त्याने हिरव्या-पिवळ्या रंगाच बुडलेला स्वतःचा फोटो ट्वीट केला आहे ज्यावर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत.

एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, गोवऱ्याला शोधा तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, जास्त झालं भावा. तर आणखी एकानं कमेंट करत म्हटलं आहे की,आरा रा... मारतो का मी आता... छान गौरव...!अशा एकापेक्षा एक प्रितिक्रीया आल्या आहेत 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive