आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘बाईपण पण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, स्त्रीत्वाचा बहुमान साजरा करणारी ही फिल्म येत्या ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
खुद्द सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मिडिया माध्यमांव्दारे याची माहिती दिली आहे. त्याने आपल्या अकाउंट वर असे लिहीले आहे कि, "आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला व्हावा असे मला नेहमी वाटते. तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे. आणि आता तुम्हीही ते अनुभवू शकता, ३० जूनला “बाईपण भारी देवा” हा चित्रपट पाहताना...
खूप शुभेच्छा ! "
बाईपण भारी देवा ही अश्या सहा बहिणींची गोष्ट आहे ज्यात प्रेम, माया, तडजोड, जिद्द, ध्येय, दुःख, स्वार्थ अशा अनेक भावनांचा खजिना आहे. स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, आणि तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करता करता, "थांब, जरा श्वास घे" म्हणत तिच्या कौशल्याला दाद देणारी ही कहाणी आहे.
आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला हवा असे मला नेहमी वाटते.
तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे.
३० जूनला तुम्हीही ते खात्रीने अनुभवू शकता “बाईपण भारी देवा” हा चित्रपट पाहताना…
१/२
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 8, 2023
या सहा जणी जेव्हा नाईलाजास्तव म्हणा एकत्र येतात तेंव्हा त्यांच्याही नकळत त्यांच्या भूतकाळावर आणि वैयक्तिक संघर्षांवर मात करत असताना त्यांच्या मनाची, भावनांची होणारी घालमेल, उडणारा गोंधळ यांचा मजेदार प्रवास यात घडताना दिसतो.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, माधुरी भोसले निर्मित, बेला शिंदे आणि अजित भुरे सह-निर्मित, आणि केदार शिंदे द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या अभिनयनाने नटलेला "बाईपण भारी देवा" ही विनोदी - कौटुंबिक सिनेमा येत्या ३० जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रदर्शीत होण्यासाठी सज्ज आहे.