बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
मिस्टर इंडिया या अनिल कपूर श्रीदेवी अभिनीत सुपरहिट सिनेमातील सतीश कौशिक यांची कॅलेंडर ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. याच आठवणींना अभिनेत्री हेमांगी कवीने उजाळा दिला आहे. तसंच तिने सतीशजींसोबत स्क्रीनसुध्दा शेयर केली होती.
हेमांगी कवीची पोस्ट
Can we skip this day from our Calendar?
लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते Glass ने बडवत “Calendar खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं. मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची. पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक.
तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणाला, “80-90s के हर बच्चे की यही कहानी है!”
८०-९० च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या Calender ने समृद्ध केलंय आणि मनात कायमचं Tick ही करून ठेवलंय!
असं म्हणतात जुनं calendar घरात ठेऊ नये पण हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील!
It was pleasure working with you Satish ji!