By  
on  

''यावर्षी आमचं ‘कॅलेंडर’ हरवलं यार..'' सतीश यांचा फोटो शेअर करत मराठी अभिनेता भावूक

हिंदीतील  प्रसिध्द अभिनेते- दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरलीय. सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. मराठमोळा अभिनेता  कुशल बद्रिकेने देखील सतीश यांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 मिस्टर इंडिया या अनिल कपूर श्रीदेवी अभिनीत सुपरहिट सिनेमातील सतीश कौशिक यांची कॅलेंडर ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. ८०-९० च्या काळातील प्रत्येक लहान मुलांना हा कॅलेंडर कायम लक्षात राहिल.  याच आठवणींना मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेने उजाळा दिला आहे.

अभिनेता कुशल बद्रिकेनं याचं ‘कॅलेंडर’ ची आठवण करत एक फोटो शेअर केला आहे. सोबतच एका ओळची पण तितकीच भावुक करणारी अशी पोस्ट लिहिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, या वर्षी आमचं calendar हरवलं यार.  कुशलच्या या पोस्टनंतर सेलेब्ससोबत चाहत्यांनी देखील सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive