नुकताच ८ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. अनेक सेलिब्रिटी यानिमित्ताने व्यक्त झाले. याचनिमित्ताने माझा होसील ना या लोकप्रिय मालिकेची अभिनेत्री गौतमी देशपांडेने एक खंत व्यक्त केली आहे. गौतमी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आता तिची एक इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. आता काल महिला दिनानिमित्त तिने महिलांना मिळणारा पगार आणि पर डे यावर भाष्य केलं.
गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिलं, “महिला दिनाच्या शुभेच्छा! मुलींना पण मुलांसारखी त्या डिझर्व करत असलेली सॅलरी आणि पर डे मिळू देत…बाकी काही त्रास नाहीत आयुष्यात.”