By  
on  

“एखाद्यासारखं सुंदर होण्यापेक्षा…” तेजश्रीची पोस्ट चर्चेत

मराठी मालिका, सिनेमा, नाटक अश्या तिन्ही क्षेत्रांत अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. 'तुझे नी माझे घर श्रीमंताचे', 'लेक लाडकी या घरची', 'होणार सून मी त्या घरची', 'प्रेम हे', 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकांमध्ये तेजश्रीच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

पडद्यावर बिनधास्त आणि निर्भीड भूमिका करणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात देखील तितकीच रोखठोक आहे. पडद्यावर नेहमीच समजूतदार मुलीच्या भूमिका करताना दिसणारी तेजश्री प्रत्यक्षात सुद्धा खंबीरपणे उभी राहणारी आहे.

तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच तेजश्रीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक गोड फोटो शेअर केला आहे. याचसोबत तिने चाहत्यांसाठी एक खास संदेशसुध्दा दिला आहे. 

“हॅलो, एखाद्यासारखं सुंदर होण्याचा प्रयत्न करु नका. त्यापेक्षा तुम्ही स्वत:सारखे सुंदर बना!! #सुखी जीवन”, असे कॅप्शन तेजश्रीने या फोटोला दिले आहे.

तेजश्रीची ही सकारात्मक पोस्ट पाहून चाहतेसुध्दा खुश झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive