By  
on  

काही दिवसांपूर्वी भाऊजींना आणि आता बहिणीला गमावलं, मराठमोळी अभिनेत्री बुडाली शोकसागरात

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणून भाग्यश्री मोटे ओळखली जाते. ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमुळे ती प्रसिध्दीझोतात आली. अनेक मराठी सिनेमांमध्येही ती झळकलीय. भाग्यश्री सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. चाहत्यांशी संपर्कात राहते. अलिकडेच तिचा साखरपुडासुध्दा मोठ्या थाटात साजरा झाला होता. या सोहळ्यासाठी खुद्द ह्रतिक रोशन उपस्थित होता. 

भाग्यश्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या सख्ख्या  बहिणीचं निधन झालं असल्याचं भाग्यश्रीने पोस्टद्वारे म्हटलं आहे. बहिणीच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला.

भाग्यश्रीने बहिणी मधूबरोबरचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये भाग्यश्री बहिणीली किस करत आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “तू नाही आहेस?”. भाग्यश्रीला दुःख अनावर झालं आहे. बहिणीच्या आठवणींमध्ये तिने आणखी दोन पोस्ट केल्या आहेत.

बहिणी सोबतच्या  आणखी एका फोटोला ती लिहते,  “तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईतील”. असं भाग्यश्रीने म्हटलं आहे. भाग्यश्रीची ही पोस्ट पाहून तिचे चाहतेही हळहळले आहेत. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून श्रद्धांजली अपर्ण करत आहेत.

भाग्यश्री पुढे म्हणाली, “माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला. माझी आई, बहीण, मैत्रीण सगळं काही तूच होतीस. तुझ्याशिवा मी या आयुष्याचं काय करू? तुझ्याशिवाय जगणं तू मला कधीच शिकवलं नाही. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही”. फेब्रुवारी महिन्यात भाग्यश्रीच्या बहिणीच्या पतीचं निधन झालं होतं

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive