"भारतातील खुप मुली आळशी..." म्हणणा-या सोनाली कुलकर्णीवर नेटकरी संतापले

By  
on  

आपल्या सशक्त अभिनयाने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तिने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा मुलगा पती किंवा बॉयफ्रेंड म्हणून हवा असतो, पण त्या स्वतः मात्र काहीच कमावत नाहीत, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलंय, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. तिचं हे वक्तव्य साफ चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं असून त्यावर संतापजनक प्रतिक्रीया मांडल्या आहेत. 

सोनालीने एका मैत्रिणीचा किस्सा सांगितला. मैत्रीण लग्नासाठी मुलगा शोधत होती आणि ५० हजारांपेक्षा कमी पगाराचा मुलगा नकोच, एकटा राहत असेल तर खूपच उत्तम, सासू सासरेही नको आणि त्याच्याकडे कार असावी, असं तिचं म्हणणं होतं.

“मी तिला म्हटलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे,” असं मत सोनालीने मांडलं.

 

सोनालीच्या एका कार्यक्रमातील या व्हिडीओने चांगलीच खळबळ माजवून दिलीय. 

 

“भारतातील स्त्रिया आळशी आहेत, असं उच्चवर्णीय महिलाच म्हणू शकते. या देशातील महिलांकडे पाहा. कामाचा योग्य मोबदला न मिळणाऱ्या महिलांना त्या गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. या देशात महिला कोणत्या परिस्थितीतून जातात याचा सरकारी डेटा तुम्ही वाचायला हवा,” असं एका युजरने म्हटलं आहे.

 

Recommended

Loading...
Share