घशाच्या इन्फेक्शनमुळे त्रस्त आहे गायिका आर्या आंबेकर

By  
on  

सारेगमपा लिटिल चॅम्प्स मधून महाराष्ट्राला सुमधूर गळ्याची गोड गायिका मिळाली. आर्याने आपल्या स्वरांनी रसिक प्रेक्षकांवर मोहिनी तर केलीच परंतु तिच्या सोंदर्याने घायाळसुध्दा केलं. गायिका असण्यासोबतच ती एक उत्तम अभिनेत्रीसुध्दा आहे. 

नुकतंच आलेलं 'केवड्याचं पान तू' गाणं असो किंवा 'तुला पाहते रे' मालिकेचं शीर्षक गीत असो किंवा 'ती सध्या काय करते' सिनेमातील 'कितीदा नव्यानं तुला पाहावे' हे गाणं असो. आर्यानं आपल्या सुमधूर गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

महाराष्ट्राची लाडकी गायिका आर्या आंबेकर सध्या घश्याचा संसर्गाचा सामना करत आहे. नुकतीच तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती नव्या गाण्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दिसत आहे.

 

"मी गेल्या काही दिवसांपासून घश्याचा संसर्गाने त्रस्त झाले आहे. पण या गाण्याच्या रचनेमुळे मी मनापासून गाणं गाऊ शकले. मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे".

 

Recommended

Loading...
Share