दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. त्यांच्या सोबत काम करण्यासाठी कलाकार नेहमीच उत्सुक असतात. महेश मांजरेकरांचा आगामी ऐतिहासिकपट वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाची घोषणेपासूनच प्रचंड चर्चा सुरु आहे. पण या सिनेमाच्या सेटवर नुकतीच एक दुर्देवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरात या सिनेमाचं शूटींग सुरु आहे.
पन्हाळगडावर शूटिंगच्या दरम्यान कड्यावरून पडून अपघातात एक कलाकार गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने उपचारासाठी कोल्हापूरात दाखल करण्यात आले आहे. पन्हाळा येथील मुख्य सज्या कोटी ते वारे बुरुज दरम्यान रात्री साडे नऊच्या सुमारास शूटिंग प्रसंगी ही घटना घडली आहे. नागेश खोबरे (वय १९ सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. एका लोकप्रिय वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मराठ्यांचा धगधगता इतिहास दाखवणा-या वेडात मराठे वीर दोडले सात या बिग बजेट सिनेमाचं शूटींग गेले चार दिवस अहोरात्र सुरु आहे. तेव्हा ही घटना घडली.
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात छज्ञपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असल्याने या सिनेमाबाबत विविध चर्चांना उधाण आलं. बिग बॉस मराठीतले अनेक कलाकार यात सात वीरांमध्ये झळकतायत. प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
(Source : Loaksatta )