By  
on  

शिवालीची भिवालीसाठी खास पोस्ट, reel ही केलं शेअर

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा फक्त अवघ्या  महाराष्ट्राचाच नाही तर देश-विदेशातील लोकांचा लाडका कार्यक्रम. या कार्यक्रमात विविध व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारे कलाकार नेहमीच आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमातील एक फेमस सिरीज म्हणजे कोहली परिवार. प्रत्येक गोष्टी नंतर ली जोडणारा हा परिवार समोरच्याला नाकेनऊ आणतो. या कार्यक्रमात बिवाली म्हणून प्रसिध्द असलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिचा फुलराणी हा सिनेमा येत्या गुढी पाडव्याला प्रदर्शित होतोय. अभिनेता सुबोध भावे सोबत प्रियदर्शनी स्किन शेयर करतेय. 

शिवाली परब ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच शिवालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती आणि प्रियदर्शनी ‘फुलराणी’ चित्रपटाचा एक प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे. याला शिवालीने हटके कॅप्शनही दिले आहे.

 

शिवाली परबची पोस्ट

“फॉर बीवाली.

कुठून सुरवात करू समजत नाही आहे … चार वर्ष एकत्र काम करतोय, खूप जवळुन प्रवास पाहिला आहे तुझा, ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी करावी वाटतेय, खूप कौतुक खूप प्रेम खूप शुभेच्छा, ही तर फक्त सुरुवात आहे.

कोलीवाड्याची थ्री टाईम ब्युटीक्वीन ‘फुलराणी’ येतेय फक्त ३ दिवसात, २२ मार्चपासून जवळच्या चित्रपटगृहात!!” असे शिवालीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

 

शिवालीच्या या पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. “प्रिय शिवाली, इतक्या उत्साहाने माझ्याकडून रिल करुन घेतलीस! तिथेच प्रेम कळतंय तुझं! प्रचंड थँक्यू! तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी नकळत शिकतेय! असंच एकमेकींकडून शिकत राहू! आय लव्ह यू!”  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive