By  
on  

Video : तब्बल 39 वर्षांनी 'या' लोकप्रिय गाण्यावर थिरकले सचिन-सुप्रिया

सचिन-सुप्रिया पिळगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि एव्हरग्रीन जोडी. या रील आणि ऱिअल लाईफ जोडीची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.  ही जोडी रंगमंचावर पुन्हा एकदा थिरकणार आहे. ते पण तब्बल ३९ वर्षांनी त्यांच्याच लोौकप्रिय गाण्यावर. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. 

. . सर्वांची ही लाडकी जोडी 'झी चित्र गौरव पुरस्कार' निमित्ताने तब्बल 39 वर्षांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करणार आहेत. काहींनी हे गाणं देखील ओळखलं असेलच.

1984 साली आलेल्या नवरी मिळे नवऱ्याला या गाजलेल्या सिनेमात या दोघांनी हि नवरी कसली.... गाण्यावर डान्स केला होता. आता याच गाण्यावर तब्बल 39 वर्षांनी सचिन - सुप्रिया थिरकणार आहेत. दोघांचा 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सचिन - सुप्रिया यांची लोकप्रिय जोडी एकमेकांसोबत डान्स रिहर्सल करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive