दिग्दर्शक महेश मांजरेकर हे मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. त्यांच्या सोबत काम करण्यासाठी कलाकार नेहमीच उत्सुक असतात. महेश मांजरेकरांचा आगामी ऐतिहासिकपट वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाची घोषणेपासूनच प्रचंड चर्चा सुरु आहे.
या सिनेमाचं शुटींग नुकतंच सुरू झालं असून कलाकार मंडळी शुटींगसाठी कोल्हापूरात दाखल झाली आहे. कोल्हापूरात शुटींगला सुरूवात झाली असून कलाकार शुटींग दरम्यान धम्माल करताना दिसत आहेत. शुटींगला सुरूवात करण्याआधी दिग्दर्शक महेश मांजरेकर सगळ्या कलाकारांना घेऊन एका ठिकाणी गेले. ते ठिकाणही सर्वांसाठी तितकंच खास होतं. अभिनेता गायक उत्कर्ष शिंदेनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात हे कलाकार पंगतीत जेवायला बसल्याचं पाहायला मिळतंय.
डात मराठे वीर दौडले सात सिनेमाचं शुटींग करत असताना दिग्दर्शक महेश मांजरेकर सगळ्या टीमला घेऊन दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला गेले. दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून पंगतीत जेवण केलं. अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनं कोल्हापूरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचप्रमाणे उत्कर्षनं पोस्ट लिहिली आहे. त्यानं म्हटलंय, "दिग्दर्शनात एक नट म्हणून महेश मांजरेकर यांच्याकडून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्या सारखं नाहीये .एक वेगळाच अनुभव सर्व गुणी कलाकारानं सोबत वेळ घालवता येतोय ,प्रवीण तरडे दादा ,सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र" .
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असल्याने या सिनेमाबाबत विविध चर्चांना उधाण आलं. बिग बॉस मराठीतले अनेक कलाकार यात सात वीरांमध्ये झळकतायत.
सिनेमात अभिनेता हार्दीक जोशी, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे,प्रविण तरडे, विराट मडके, जय दुधाणे हे कलाकार आहेत. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील सिनेमात होता पण त्याला सिनेमातून काढल्याच्या चर्चा आहेत. सिनेमात त्याच्या जागी अभिनेता सिद्धार्थ जाधव असल्याचं म्हटलं जात आहे.