By  
on  

Video : प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पवारने शोभायात्रेत चालवला दांडपट्टा

गुढी पाडवा या मराठी नववर्षाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्वत्र शोभायात्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या आवडत्या मालिकांमधले अनेक कलाकार या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले होते. आता कोल्हापूर येथील शोभायात्रेत अभिनेत्री अमृता पवार हिने दांडपट्टा चालवला.

अमृता पवार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सध्या ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’ या मालिकेतून तानिया व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. अशातच ती शोभायात्रेतील तिच्या व्हिडीओमुळे खूप चर्चेत आली आहे.

कोल्हापूरच्या गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेत पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत म्हणजेच साडी नेसून अमृताने दांडपट्टाट्याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं. उपस्थितांसोबतच हा व्हिडीओ पाहून तमाम नेटकरी तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive