बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक झालं. पहिला रनर अप ठरलेल्या शिवला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नसलं तरी नेहमीप्रमाणेच त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली . त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे.
शिवने काही दिवसांपूर्वीच नवी कोरी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर आता शिवने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.
शिवने स्वत:चा नवा व्यवसाय सुरू केला आहे. ‘ठाकरे: चाय अँड सॅन्क्स’ नावाचा ब्रँड सुरू केला आहे. बुधवारी शिवने त्याच्या हा ब्रँड लॉन्च केला आहे. ‘ठाकरे: चाय अँड सॅन्क्स’ नावाने शिव मुंबई, पुणे व अमरावतीत रेस्टॉरंट सुरू करणार आहे. “ठाकरे: चाय अँड सॅन्क्स हा ब्रँड मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याबरोबरच या ब्रँडचे अनेक ठिकाणी रेस्टॉरंट्स मला सुरू करायचे आहेत”, असं शिव म्हणाला.
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवने आपला हा गरमागरम चाय आणि स्नॅक्सचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याच्यावर सर्वच बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
लवकरच चाहते काही महिन्यात शिवला सिनमेातसुध्दा पाहू शकणार आहेत. याबाबत त्याने त्याच्या या ब्रॅण्डच्या शुभारंभावेळी भाष्य केलं. . तो म्हणाला, “पुढच्या सहा महिन्यात किंवा एका वर्षात मी तुम्हाला माझ्या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी भेटेन. यासाठी माझी तयारी सुरू आहे”.