By  
on  

दोन दिवसांपासून 'ही' प्रसिध्द मराठी अभिनेत्री आजारी शेयर केली पोस्ट

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना करोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा एकदा या रोगाने डोकं वर काढल्याच्या चर्चा रंगल्या. आत्ताही अनेक जण मास्क लावून फिरतायत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. अशातच प्रसिध्द अभिनेत्रीच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. चाहत्यांना अभिनेत्रीची खुप काळजी वाटतेय. 

ही प्रसिध्द अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी कलरफुल म्हणजेच पूजा  सावंत. पूजाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ती आजारी असल्याचं सांगितलं आहे. गेले दोन दिवस पूजाला व्हायरल ताप आहे. त्यामुळे तिने सर्वांना मास्क लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यात एका स्टोरीत पूजा औषध घेताना दिसत आहे तर दुसऱ्या स्टोरीत तिची आई तिला काढा देताना दिसून येत आहे.

लाडकी अभिनेत्री पूजा आजारी आहे, हे कळल्यावर चाहते हळहळले आहेत. पूजा सध्या घरी आराम करत असून ती लवकरात पावकर बरी होऊन तिच्या कामाला सुरुवात करेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive