By  
on  

'सहकुटुंब सहपरिवार'च्या सरु वहिनींचा कारनामा, "लाल रंगाची लिपस्टिकही न लावणारी मुलगी…”

सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर  यांच्या सूर्या आणि सरिता या व्यक्तिरेखांनी सजलेली 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. एका सामान्य कुटुंबाची एकमेकांना मायेनं बांधून ठेवणारी सहकुटुंब सहपरिवारची गोष्ट  रसिक प्रेक्षकांना खुप भावते. यातील सर्वच व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंय.

नुकतंच मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक खास गोष्टी सामान्यापांसून ते कलाकारांनी घेतल्या आणि याच मुहूर्तावर 'सहकुटुंब सहपरिवार'च्या सरु वहिनींनीसुध्दा एक कारनामा केला आहे. एक छान नवी कोरी गाडी सरु वहिनी फेम अभिनेत्री नंदिता पाटकर हिने विकत घेतलीय. गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत तिने ही माहिती दिली.

नंदिताने लाल रंगाची Hyundai i20 कार खरेदी केली आहे. या गाडीबरोबरचे फोटो शेअर करत तिने तिचा एक किस्सा सांगितला. तसेच लाल रंगाची नंदिताने कधी लिपस्टीकही लावली नाही. पण तिने आता चक्क लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. याचबाबत एक खास पोस्ट नंदिताने शेअर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nandita Patkar (@mi_nandita)

ती म्हणाली, “नेहमीच लाल रंगाची मला थोड्या फार प्रमाणात भीती वाटायची. जी मुलगी लाल रंगाची लिपस्टीकही वापरत नाही तिने आज लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. लाल रंगाची गाडी खरेदी करायची की नाही याबाबत मला शंकाच होती. पण नव्या वर्षामध्ये आयुष्यात काही नवे बदल घडवून आणण्याचा मी निर्णय घेतला”.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive