मनसेच्या गाण्यावर परश्या फिदा, कमेंट करत म्हणतो...

By  
on  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची दरवर्षी बरीच उत्सुकता असतो. हजारो-लाखोंच्या संख्येने मनसैनिक जमतात. यंदा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे गीत या मेळाव्यात प्रदर्शित केले. संगीतकार हितेश मोडक आणि सर्वांचे लाडके गायक अवधूत गुप्ते यांनी ते सादर केले आहे. हे गाणं सध्या प्रचंड ट्रेंड होत आहे. या गाण्यावर सर्वांचा लाडका परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरनेही प्रतिक्रीया दिली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hitesh Modak (@hiteshmodak)

 

मनसेचे नवीन पक्षगीत हे ५ मिनिटांचे आहे. “प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…” असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्याची सुरुवात राज ठाकरेंच्या आवाजाने होते. मंदार चोळकर यांनी हे गीत लेखन केले असून संगीतकार हितेश मोडक यांनी याला संगीत दिले आहे.

 

प्रसिद्ध संगीतकार हितेश मोडक यानेही या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेता आकाश ठोसरने या गाण्यावर ‘कडक’ अशी कमेंट केली आहे. त्याबरोबर त्याने ‘फायर’चे काही इमोजीही शेअर केले आहे. आकाशच्या या कमेंटवर हितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘धन्यवाद भावा’, अशी कमेंट हितेशने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

Recommended

Loading...
Share