आपल्या सुरेल स्वरांच्या जादुंनी रसिकांवर अनेक दशकं मोहिनी घालणा-या लाडक्या आशाताई म्हणजेच आशा भोसले यांना यांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित सोहळ्यामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर होते. या कार्यक्रमात आशा भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं.
आशा भोसले यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त केलं. मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यावर तिचं कौतुक होतं, तसं मला आज वाटतंय. डोक्यावरुन, पाठीवरुन मायेचा हात फिरवतायत. महाराष्ट्राची मुलगी असून आज मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, असं आशा भोसले म्हणाल्या.
And that historic moment of one of the greatest honours ever for us, of honouring the evergreen, legendary Adarneeya @ashabhosle tai with the #MaharashtraBhushan 2021 Puraskar.
CM @mieknathshinde ji, Speaker @rahulnarwekar ji, Minister @SMungantiwar ji, BharatRatna @sachin_rt,… pic.twitter.com/8Q9kXL4K9x— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 24, 2023
महाराष्ट्र भूषण मिळालाय हा भारतरत्न आहे. माझ्या घरातून मिळालेलं आहे हे मोठं आहे. ९० वर्षांपर्यंत थांबलेय, असं आशा भोसले म्हणाले.
आशा भोसले यांनी यावेळी दत्ता डावजेकर, सुधीर फडके, वसंत प्रभू, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव, श्रीधर फडके, लता मंगेशकर आणि ह्रदयनाथ मंगेशकर, आरती प्रभू, पी. सावळाराम, सुधीर मोघे, ग.दि. माडगूळकर यांच्या नावाचा उल्लेख केला. या लोकांनी गाण्याचं जीवन समृद्ध केलं, असं आशा भोसले म्हणाल्या.
मी फक्त मराठीचं नाही तर भारताची कन्या असल्याचं आशा भोसले म्हणाल्या. आशा भोसले यांनी हिंदी संगीत दिग्दर्शक आणि गीतकारांना देखील विसरु शकणार नाही, असं मनोगत व्यक्त केलं.