‘परश्या’ने बांधस्या मुंडावळ्या म्हणतो नवरदेव तयार.., ह्या अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

By  
on  

नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर ही जोडी सैराटनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘घर बंदुक बिर्याणी’ हे नागराज यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. दरम्यान आकाश ठोसरने शेयर केलेल्या एका फोटोने चांगलीच चर्चा रंगलीय. त्याने मुंडावळ्या बांधून आणि नवरदेवासारखी शेरवानी घालून एक फोटो पोस्ट केलाय. आकाश सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. 

आकाश ठोसर हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने नुकतंच मुंडावळ्या बांधून एक फोटो पोस्ट केला आहे. “जमलंय बर का…….. यायला लागतय!!! १० दिवस बाकी”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. त्यामुळे आकाश ठोसर आता लग्नबंधनात अडकतोय, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्याची नवरी कोण आहे, कोणासोबत तो लग्नबंधनात अडकतोय, या चर्चासुध्दा रंगल्या असतानाच एका अभिनेत्रीच्या कमेंट्ने लक्ष वेधलंय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

या फोटोवर अभिनेत्री सायली पाटीलने कमेंट केली आहे. तिने आकाशचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “नवरी तयार आहे”, अशी कमेंट सायलीने केली आहे.

यावरुन स्पष्ट दिसंतय की आकाशचं हे खरखुरं लग्न नसून सिनेमातल्या लग्नाबद्दल तो बोलतोय.यात अभिनेत्री सायली पाटील त्याची नायिका आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sayli Patil (@sayliipatil)

येत्या ७ एप्रिलला त्याचा घर, बंदूक, बिरयानी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहेया चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत

 

Recommended

Loading...
Share