फोटोतील या लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलंत का?

By  
on  

सध्या सोशल मीडियावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचे  किशोरवयीन वयातले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून या अभिनेत्रीला ओळखनं देखील कठीण झालं आहे. 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तिच्या शाळेच्या दिवसातील काही फोटो शेअर केले आहेत.

मालिकाविश्वात या  अभिनेत्रीचं मोठं नाव आहे. ऐतिहासिक भूमिकांसाठी ती ओळखली जाते. 

ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड होय.

 

तिनं म्हटलं आहे की, आज जागतिक रंगभूमी दिन...याच निमित्ताने शाळेत असताना "चाणक्य की प्रतिज्ञा" हे हिंदी एकांकिका स्पर्धेत केलेलं नाटक.. त्यात केलेली चाणक्याची प्रमुख भूमिका... सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून प्रथम क्रमांक पटकावला.... त्याचेच काही #photos 

 

प्राजक्ता गायकवाडचे चाणक्याच्या रुपातील हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Recommended

Loading...
Share