"त्या एका कॅाल ने माझं लाईफ..." 'ठरलं तर मग'च्या यशानंतर जुई गडकरीची पोस्ट

By  
on  

जुई गडकरी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अनेक विविध मालिकांमधून तिने आपल्या सहज-सुंदर अभिनयाची छाप पाडलीय. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.  त्याचं कारण म्हणजे 'ठरलं तर मग' ही मालिका. या मालिकेत जुई सायलीची भूमिका साकारत आहे. नुकतेच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार केला. त्यासोबतच ही मालिका गेली पाच आठवडे सलग टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. नव्याने सुरू झालेल्या मालिकेने टीआरपीमध्ये प्रथम स्थान मिळवणं ही संपूर्ण मालिकेच्या टीमसाठी गौरवास्पद बातमी आहे. 

जुई सोशल मिडियावर सतत अ‍ॅक्टीव्ह असते. या मालिकेसाठी मिळणारा भरभरुन प्रतिसाद पाहून ती भारावलीय आणि प्रेक्षकांचे आभार मानणारी पोस्ट तिने केलीय. जुई गेली कित्येक महिने एका मोठ्या आजाराचा सामना करत होती. ब-याच कालावधीने ती पुन्हा अभिनयाकडे वळली आणि तिला मुख्य भूमिका मिळाली. 

 

 

 

जुई फेसबुक पोस्टमध्ये लिहते

 

आज आमच्या “ठरलं तर मग” चे १०० भाग पुर्ण होत आहेत!!! 
तो पहिला call आज खुप आठवतोय!! त्या एका कॅाल ने माझं लाईफ चेंज केलं!!! गेल्या जुलै ला मी सोहम प्रॅाडक्शन्स चा भाग झाले!! आणि आज माझी ही फॅमिली १०० भागांची झाली!!! मी आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुई ला  “सायली” दिली!!! 
हि मालिका माझ्यासाठी खुप जास्तं “close to my heart” आहे!! कारण एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना या मालिकेने मला आपलंसं केलं! आणि मी आज एक पुर्ण वेगळं लाईफ अनुभवतेय!! या सेट ची, crew ची Positivity ईतकी आहे की मला परत मागे वळुन बघायचंच नाहिये!! मी फक्तं त्रुणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.. मला नेहेमी confidence दिला की मी करु शकेन! 
तुमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहेमी पाठीशी असुद्या️ त्यातुनच मला ताकद मिळते रोज जोमाने काम करायची 
जय गुरुदेव दत्त

Recommended

Loading...
Share