By  
on  

‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात झालेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी केले हे आरोप

महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाच्या पन्हाळगडावर शूटिंगच्या दरम्यान कड्यावरून पडून अपघातात एक कलाकार गंभीर जखमी झाला होता. त्याचा आता दुर्देवी मृत्यू झाला आहे.  १९ मार्च रोजी ही घटना घडली होती. त्या तरुणाला तातडीने उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्यात आले होतं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.  नागेश खोबरे (वय १९, सोलापूर) असे तरुणीचे नाव होते.

‘टीव्ही ९ हिंदी’ने दिलेल्या वृत्तानुसार, नागेश चित्रपटाच्या सेटवर घोड्यांची काळजी घेत होता, त्याच दरम्यान त्याचा अपघात झाला. जखमी नागेशला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याला चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोलावलेल्या व्यवस्थापकांनी नागेशच्या उपचाराचा खर्च त्याच्या नातेवाईकांना देण्याचे मान्य केले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत खर्च केलेली रक्कम नातेवाईकांना मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार या सिनेमात छज्ञपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असल्याने या सिनेमाबाबत विविध चर्चांना उधाण आलं. बिग बॉस मराठीतले अनेक कलाकार यात सात वीरांमध्ये झळकतायत.  प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive