“मी मिमिक्री करते हे अशोक मामांना कळल्यानंतर…” ‘ हास्यजत्रा’मधील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

By  
on  

मराठी सिनेमातील विनोदी अभिनयाचे बेताज बादशाह म्हणजे अशोक सराफ. यंदा त्यांनी आपल्या वयाची 75 वर्ष पूर्ण केली. तसंच यंदा त्यांना झी चित्र जीवनगौरव पुरस्कारानेसुध्दा गौरविण्यात आलं. यावेळीस भावूक होत अशोक मामा म्हणाले दरवेळेस नट म्हणूनच जन्म घ्यावा असं वाटतं. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री चेतना भटने एक पोस्ट शेअर केली.

चेतनाने तिच्या इन्स्टाग्रामवर अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “एकतर अशोक मामांसारख्या मोठ्या कलाकाराला भेटण्याचा आनंद आणि वर त्यांना मी त्यांची मिमिक्री करते हे कळल्यानंतरचे एक्सप्रेशन्स…” असे चेतना म्हणते, 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chetana Bhat (@bhatchetana)

Recommended

Loading...
Share