By  
on  

अरुंधतीचा रोल बदलला, लेक म्हणते मी तुझी आई, पाहा Video

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

सोशल मिडीयावर अरुंधती नेहमीच सक्रीय असते. मालिकेविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी , सीन्सविषयी त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल ती सतत व्यक्त होत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट-व्हिडीओंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. पडद्यामागच्यासुध्दा अनेक गोष्टी मधुराणी इथे शेयर करते. मधुराणीने नुकताच एक तिच्या लेकी सोबतचा एक धम्माल व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर केला आहे. 

मधुराणीच्या लेकीचं नाव स्वराली आहे. स्वरालीसोबत तीनं एक रील केलं आहे. या रीलला एक भन्नाट कॅप्शन देखील तिनं दिल आहे. तिनं म्हटलं आहे की, लगी जेव्हा आई होते....असं म्हणत या दोघीं एका इंग्रजी गाण्यावर रील सादर करत आहेत. चाहत्यांना देखील माय लेकीची धमाल रील प्रचंड आवडलेली आहे. शिवाय अनेकांनी कमेंट करत या माय लेकीचं कौतुक देखील केलं आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive