By  
on  

'आम्हाला दुसरी उर्फी नकोय', सई ताम्हणकरच्या नव्या फोटोशूटवर नेटक-यांच्या कमेंट्स

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच केलेल्या फोटोशूटमुळे सई ट्रोल झाली आहे.

 या फोटोंमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

पण सईचा हा लूक काही नेटकऱ्यांना रुचलेला दिसून येत नाहीय. त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केलीय. 

सईच्या या लुकची तुलना दररोज हटके आणि अतरंगी फॅशन करणा-या मॉडेल उर्फी जावेद सोबत केली जातेय. 

त्यामुळे त्यांनी सईच्या या लुकवर प्रतिक्रिया देत, 'आम्हाला दुसरी उर्फी नको आहे', उर्फीची बहीण, 'उर्फीच्या दिशेने वाटचाल', अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive