By  
on  

गुलाबाच्या कळीला चाहत्याने भर कार्यक्रमात केलं प्रपोज

 आपल्या अभिनय आणि लूक्सच्या जोरावर अभिनेत्री तेजस्विनीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. घारे डोळे आणि नितळ चेहरा लाभलेल्या तेजस्विनी पंडितचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. तेजस्विनी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. एक स्टाईल आयकॉनही आहे. या गुलाबाच्या कळीवर असंख्य चाहते नेहमीच फिदा होतात. पण या कळीला भर कार्यक्रमात प्रपोज करण्याचं धाडस ेका युवकाने नुकतंच केलं आणि याची खुपच चर्चा रंगली. 

तेजस्विनी अलिकडेच सांगलीतील एका इन्स्टिट्यूमध्ये तरूणाईसोबत संवांध साधण्यासाठी आली होती.विषय होता अभिनय क्षेत्रातील आव्हानं आणि संधी. या मुक्त संवादा दरम्यानच समोर जमलेल्या तरुणांमधील एकानं हिम्म्त करत मोठ्यानं तेजस्विनीला 'आय लव्ह यू' म्हणत साद घातली आणि एकच गोंधळ उडाला आणि हशाही पिकला.पण पुढे काही घडलं नाही. एवढ्यावरच थांबंलं. 

कलाकारांच्या आयुष्यात अशा घटना नेहमीच घडत असतात. त्यांना कसं तोंड द्यायचं हेसुध्दा या कलाकारांना नीट माहित असतं. तसंच अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांचे अगदी घराचे पत्तेही चाहते शोधून काढतात आणि कधी पत्र, कधी फुलांचा बुके,कधी गिफ्ट्स अशा अनेक गोष्टी पाठवत असतात.

अनेकदा चाहत्यांचे हे प्रेम इतकी हद्द ओलांडतात की कलाकारांना त्याचा त्रासही होतो

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive