By  
on  

‘सगळेच पुरस्कार सारखे नसतात…’:,प्रविण तरडेंची पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतले प्रसिध्द दिग्दर्शक -अभिनेते प्रविण तरडे हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. नेहमीच आपल्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात चाहत्यांना अपडेट देत राहतात. पण नुकतंच प्रविण तरडे यांनी एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक अभिनित धर्मवीर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं. या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रसाद ओकच्या भूमिकेबरोबरच प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचंही तेवढंच कौतुक झालं होतं. तर आता या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालं आहे.

धर्मवीरला आता फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी धर्मवीरला  अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण फिल्मफेअर पुरस्कार खुप खास अल्याचं प्रविण तरडे यांनी म्हटलंय. प्रविण तरडे यांनी त्यांना मिळालेल्या या ट्रॉफीचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहीलं, “सगळीच बक्षिसे सारखी नसतात , काही फिल्मफेअर असतात…फिल्मफेअर २०२३…सर्वोत्कृष्ट संवाद – धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे.”

अनेकांनी प्रविण तरडेंच्यया या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive