By  
on  

25 वर्षांपूर्वी समीर चौघुले असे दिसायचे, पाहा ही पोस्ट

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून समीर चौघुले हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी अभिनयाच्या वर्षावात न्हाऊन टाकतात. त्यांच्या स्किट्सची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. 

महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या चौघुलेंनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. १९९७ सालातील जवळपास २५ वर्षांपूर्वींचा तारुण्यातील फोटो शेअर केला आहे.

समीर चौघुलेंनी शेअर केलेल्या या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोला त्यांनी “‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा”, असं कॅप्शन दिलं आहे.

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील सर्वच कलाकार पोस्ट ऑफीस उघडं आहे, या मालिकेत काम करत होते. आता लवकरच ही विनोदी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive