चतुरस्त्र भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवर ते आपलं रोखठोक मत मांडताना दिसतात. अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे.एक पोस्ट करत शरद पोंक्षे यांनी सर्वांचं लक्षच वेधून घेतलं नाही तर कौतुकाचा विषय ठरलेत.
'माफी मागायला मी सावरकर' या नाही' राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा व शिवसेना(शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेत भाजपा व शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या १०२ वर्षांच्या आजीनेही या यात्रेत सहभाग घेतला आहे. शरद पोंक्षेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
शरद पोंक्षेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत सहभागी झालेल्या त्यांच्या आजीचे फोटो शेअर केले आहेत. “माझी आजी (श्रीमती ईंदिरा भट)वय १०२ वर्षे सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाली मिरज येथे,” असं कॅप्शन पोंक्षेंनी या फोटोला दिलं आहे.
राहुल गांधीच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना शरद पोंक्षे म्हणाले होते," एक तर सावरकरांनी आयुष्यात कधीही माफी मागितली नाही, हे सावरकरांवर व्याख्यान देणारे आणि त्यांच्या वंशजांनीही सांगितलं आहे. ‘दयेचा अर्ज’ असं त्याला म्हणतात, हे अनंत वेळा सांगून झालं आहे. पण ही राहुल गांधी आणि त्यांची टीम ही झोपेचं सोंग घेतलेले लोक आहेत”