By  
on  

'....मग माझा खून झाला तरी चालेल' केतकी चितळेची खळबळजनक पोस्ट

अभिनेत्री केतकी चितळे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यात तिचा हातखंडा आहे. केतकीची एक पोस्ट  व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली असली तरी ही पोस्ट म्हणजे कसले संकेत तर नाहीत ना अशी खळबळ उडाली आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या केतकी चितळेनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिनं तिचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की,मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली 7 वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल' अशी पोस्ट केतकीने केली आहे.

 

केतकी एवढ्यावर थांबलेली नाही ती पुढे या पोस्टाला कॅप्शन देत म्हणते की, 'सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही. सत्य आणि खोटेपणा लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत.एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझा मृत्यू झाला, किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेतल्याचं असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल.मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive