By  
on  

पाहा Video : मनसेच्या पक्षगीतावर जबरदस्त थिरकली प्राजक्ता माळी

रानबाजार या वेबसिरीज नंतर प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या वाय या सिनेमातील भूमिकेसाठी सुद्धा तिचं कौतुक करण्यात आलं. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर अनेक फोटोस् पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिच्या बहारदार निवेदनाचं नेहमीच कौतुक होतं. नुकतंच प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. प्राजक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षगीतावर जबरदस्त थिरकताना या व्हिडीओत पाहायला मिळतेय. 

मनसेचे नवीन पक्षगीत हे ५ मिनिटांचे आहे. “प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…” असे या गाण्याचे बोल आहेत. नुकतंच ‘राज ठाकरे फॅन क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत प्राजक्ता ही गाण्याच्या लिरिक्सप्रमाणे डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताला हे गाणं तोंडपाठ असल्याचेही दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अवधूत गुप्तेंच्या भारदस्त आवाजात हे गाणं स्वरबध्द झालंय. 

दरम्यान या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. “महाराष्ट्राची मराठमोळी शेरणी….”, अशी कमेंट एका व्यक्तीने या व्हिडीओवर केली आहे. तर एकाने “नुसत गाण्यावर नाचून चालणार नाय , सरकार मनसे च आल पाहिजे असं काहीतरी करा”, असं म्हटलंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive