सध्या सोशल मिडीयाचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचा सामना करण्याची हिंम्मतसुध्दा ठेवणे गरजेचे असते. चाहते आणि नेटकरी या सोशल मिडीयाच्या जगात पब्लिक फिगर्सना म्हणजेच सेलिब्रिटी, राजकारणी, नेतेमंडळी आणि इतर बडे व्यक्तींना पटलं तर सांगतात किंवा नाही पटलं तर थेट बोलून मोकळे होतात. चूक निदर्शनास आणून देतात तर कधी एखाद्या चांगल्या कृतींचं तोंडभरुन कौतुक करतात. सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातलं अंतर सोशल मिडीयामुळे बरचंसं कमी झालंय.
मराठीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. नुकतंच एका पार्टीत तिने केलेया कृत्यामुओओळे नेटक-यांनी तिला चांगलंच धारेवर धरलंय. नेहाने नुकताच तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये दिसत असून तिने हातामध्ये काही प्लेट्स एकावर एक ठेवल्या आहेत. तर दुसऱ्या हातात पकडलेली प्लेट इतर प्लेटवर आपटून ती सर्व प्लेट्स फोडत आहे. ही गोष्ट ती अत्यंत एन्जॉय करत करताना दिसत आहे. पण तिचं हे वागणं पाहून नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “तुझ्याकडे पैसे जास्त झाले असतील तर ही फालतू कामं बंद करून थोडं डोनेशन कर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “आता हे सगळं साफ कोण करणार?” तर आणखी एकाने लिहिलं, “हे असं करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. हे सगळं तू साफ करणार आहेस का? उगाचच दुसऱ्यांची काम का वाढवतेस?”
नेहाने मराठी सोबतच हिंदीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच चर्चेत असते.