मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडमध्येसुध्दा दिमाखात झळकते. अमृताचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनयासोबतच ती एक सर्वोत्तम नृत्यांगनासुध्दा आहे. सोशल मिडीयावर ती सतत सक्रीय असते. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रासुध्दा एक हिंदी कलाविश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. या क्युटेस्ट कपलचा एक गोड व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अमृता व हिमांशू हे पती-पत्नी ब-याचदा एकमेकांसोबतचे फोटो-व्हिडीओ शेयर करणं टाळतात. फक्त खासनिमित्तानेच ते व्यक्त होतात. हिमांशूच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास व्हिडिओ शेअर केला आहे. अमृताने हिमांशूला खास सरप्राईज दिलं आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने हिमांशूच्या बर्थ पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत तिनं हिमांशूच्या जवळच्या व्यक्तींना बोलावलं होतं.हिंमांशूला हे सरप्ंराईज खुप आवडलं.
"तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी हा दिवस खूप खास आहे. तू आमच्या प्रत्येकासाठी खूप खास आहेस.“माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तसेच मला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. खरंच तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”. अमृताने व्हिडीओ शेअर करत हिमांशूबाबत प्रेम व्यक्त केलं आहे. तसंच तिने फक्त सरप्राईजच प्लॅन ना्ही केलं तर त्याला कडकडून मिठी मारली आणि किसही केलं. हा गोड व्हिडीओ नेटक-यांनासुध्दा खुप आवडला आहे.